Skip to main content

Beauty

  सौंदर्य

      सौंदर्य सुंदरता... यावर मी काय बोलू!! माझा आधीच बऱ्याच जणांनी या बद्दल खूप काही लिहून ठेवलं आहे.
पण तरीही काहीं बोलायचं असेल तर एवढाच म्हणेन की माझासाठी सुंदरता म्हणजे पहिल्या पावसा नंतर येणारा मातीचा सुगंध...लहान बाळाच रडण...आणि पक्ष्यांचं कीलबिलन(जरी आज काल ते जास्त ऐकायला मिळत नाही म्हणा)
सुंदरतेचे माझा मते दोन प्रकार असतात...
एक बाह्य सुंदर्य
दुसरे ते आंतरिक सौदर्य
आता काही जनं म्हणतील किती ते नावीन्य..
तरीही....
आता कोणती सुंदरता श्रेष्ठ हा ज्याचा त्याचा प्रश्न..पण बाह्य सुंदरता म्हणजे नेमके काय!!
एखद्याचं दिसणं, राहणीमान, त्याचा आवाज, एखादा किती गोरा किव्वा काळा आहे, किती उंच किव्वा ठेंगणा आहे, दात सरळ आहेत की वाकडे आहेत, या वा इतर गोष्टींवरून सौंदर्याची केलेली तुलना म्हणजे बाह्य सुंदरता
आणि आंतरिक सुंदरतेचे म्हणाल तर एखाद्याचे वागणे, लोकांना वागवणे, त्याचं बोलणं, त्याची नजर, डोळे नाही बरं का ! आणि त्याचं मन हे सगळं आंतरिक सौंदर्या मध्ये...
आता हे झाले मानवी सौंदर्याचे पैलू, परंतु सुंदरता ही फक्त मानवी स्वरूपातच असते असं काही नाही. जगात अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या कोणत्याही मनुष्य नियमात बसत नाहीत पण तरीही सुंदर आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर एखादं गाणं! सहज पणे आपण बोलून जातो की हे गाणं किती सुंदर आहे.. एखादं चित्र painting किती सुंदर आहे...बघायला गेलं तर आजकाल... काय बरं म्हणू शकतो आपण!! हा...असे काही खास criteria ठरवले आहेत की, ' जर असं असेल तर आणि तरच ते सुंदर आहे पण खरं तर सौदर्य हे कोणत्या हि नियमांना बांधील नाही. आणि परिपूर्ण असणं म्हणजेच सौदर्य हे प्रत्येक गोष्टीचा त्या अधुरेपणात लपलेले असते ते शोधण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील एवढंच
थोडक्यात काय सुंदरता जवळ जवळ जगातल्या प्रत्येक गोष्टीत ठासून भरलेली असते, फक्त ती बघण्याची माणसा कडे नजर हवी..!!

धन्यवाद

- मेघ

Comments