सौंदर्य सौंदर्य सुंदरता... यावर मी काय बोलू!! माझा आधीच बऱ्याच जणांनी या बद्दल खूप काही लिहून ठेवलं आहे. पण तरीही काहीं बोलायचं असेल तर एवढाच म्हणेन की माझासाठी सुंदरता म्हणजे पहिल्या पावसा नंतर येणारा मातीचा सुगंध...लहान बाळाच रडण...आणि पक्ष्यांचं कीलबिलन(जरी आज काल ते जास्त ऐकायला मिळत नाही म्हणा) सुंदरतेचे माझा मते दोन प्रकार असतात... एक बाह्य सुंदर्य दुसरे ते आंतरिक सौदर्य आता काही जनं म्हणतील किती ते नावीन्य.. तरीही.... आता कोणती सुंदरता श्रेष्ठ हा ज्याचा त्याचा प्रश्न..पण बाह्य सुंदरता म्हणजे नेमके काय!! एखद्याचं दिसणं, राहणीमान, त्याचा आवाज, एखादा किती गोरा किव्वा काळा आहे, किती उंच किव्वा ठेंगणा आहे, दात सरळ आहेत की वाकडे आहेत, या वा इतर गोष्टींवरून सौंदर्याची केलेली तुलना म्हणजे बाह्य सुंदरता आणि आंतरिक सुंदरतेचे म्हणाल तर एखाद्याचे वागणे, लोकांना वागवणे, त्याचं बोलणं, त्याची नजर, डोळे नाही बरं का ! आणि त्याचं मन हे सगळं आंतरिक सौंदर्या मध्ये... आता हे झाले मानवी सौंदर्याचे पैलू, परंतु सुंदरता ही फक्त मानवी स्वरूपातच असते असं काही नाही....